झाडगाव मध्ये पशु चिकित्सा शिबिर

यवतमाळ दि ३०:- पशुसंवर्धन विभाग राळेगाव तथा रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडगाव व रावेरी या पूर परिस्थिती उद्भवलेल्या गावांमध्ये पशु चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प दरम्यान दोन्ही गावातील जनावरांना लसीकरण, गर्भ धारणा तपासणी, औषधोपचार, वंध्यत्व तपासणी व निवारण, खच्चीकरण, जंत व गोचीड निर्मूलन, खनिज मिश्रण वाटप, जनावरांचे टॅगिंग, शल्यक्रिया इत्यादी बाबीवर कार्यक्रमादरम्यान भर देण्यात आला. यावेळी दोन्ही गावातील मिळुन 333 जनावरांवर उपचार करण्यात आले. यामध्ये गाई 86, बैल 78 ,महेश 9, शेळ्या 160, या दरम्यान प्रमुख उपस्थिती डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग यवतमाळ, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी -विस्तार डॉ. प्रशांत झाडे, डॉ. रणजीत नाळे, पशुधन विकास अधिकारी राळेगाव, श्री. सचिन मेश्राम पशुधन पर्यवेक्षक, डॉ. एन बी नवरे पशुधन पर्यवेक्षक, कु.वर्षा गोंडासे - पशुधन पर्यवेक्षक, के एस भोरे परिचर, मनीष खेडकर परिचर, नयन कोकाटे, समीर जमनाके, रुपेश मेश्राम, प्रकाश भेदुरकर, कानकेश्वर शेंडे, मयूर जीवतोडे, सौरभ भोरे, थॉमस पेंदाम, तसेच रावेरी येथील सरपंच राजेंद्र तेलंगे, गजानन झोटिंग उपसरपंच रावेरी तसेच रिलायन्स फाउंडेशनचे श्री प्रफुल बनसोड, श्री तेजस डोंगरीकर जिल्हा व्यवस्थापक तसेच श्री अमोल श्रीरामे, श्री शेखर कडू रिलायन्स फाउंडेशन सहकारी तसेच ऋतुजा मेश्राम यांचे यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाचे परास्ताविकआयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले. तसेच उमेद प्रकल्पातील कृषी सखी व पशु सखी, युवा वेध मंच संस्था राळेगाव यांनी सुद्धा या कार्यक्रमांमध्ये सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी