दारव्हा बोरी अरब कामठवाडा यवतमाळ मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद

यवतमाळ, दि 4 जुलै जिमाका :- यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दारव्हा यवतमाळ रस्त्यावरील कि.मी. 133/400 बोरी(बु.) गावाजवळील अडाण नदीवरील उंच पुलाचे बांधकाम प्रगतीत असून राज्य मार्ग 282 पुलावरील जड वाहतूक लोकहितार्थ, वाहनधारकांचे व जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या पुलावरील जड वाहतूक जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचे आदेशानुसार 30 जून 2022 चे मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली आहे. दारव्हा बोरीअरब कामठवाडा यवतमाळला पर्यायी मार्ग दारव्हा शहर रेल्वे स्टेशन जवळील नेर मार्गे ( राज्य मार्ग- 257) मालखेड उत्तर वाढोणा लासिना मार्गे यवतमाळ व दुसरा दारव्हा महागांव लोणी जवळा (रा.मा.-290) येथुन यवतमाळ (रा.म.मा.-361) असा असल्याचे विशेष प्रकल्प (सा.बां.) विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. अडचुले यांनी कळवीले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी