यवतमाळ जिल्ह्यात 81 टक्के पेरण्या पुर्ण

एकुण 7 लाख 27 हजार 163 हेक्टर क्षेत्रावर झाली पेरणी कापुस 4,18,128 हेक्टर तर सोयाबीन 2,22,847 हेक्टर यवतमाळ, दि 8 जुलै जिमाका :- यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरूवात झाली असून आतापर्यंत 81 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. खरीप हंगाम 2022-23 मध्ये एकुण 9 लाख 2 हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने आतापर्यंत एकुण 7 लाख 27 हजार 163.40 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात कापुस – 418128.4 हेक्टर, सोयाबीन -222847 हे., तुर- 78284 हे., ज्वारी- 2972 हे., मुग 1575 हे., उडीद 1598 हे., ऊस 1597 हे., मका 103 हे., तीळ- 54 हे. व बाजरी 5 हेक्टर असे एकुण 7,27,163.40 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे सरासरी वार्षीक पर्जन्यमान 926.80 मिमि ( जून ते सप्टेंबर वार्षिक सरासरी 805 मी.मी.) असुन, दि 8 जुलै 2022 पर्यत जिल्ह्यात 215.90 मि.मी. पाऊस पडलेला आहे. एकुण सरासरी पावसाच्या तुलनेत पावसाची टक्केवारी 26.82 टक्के तर आज रोजीपर्यंतच्या (8 जुलै) सरासरीच्या तुलनेत 93.8 टक्के पाऊस झाला आहे. सध्यास्थितीत चांगला पाऊस झाल्यामुळे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी