भारतीय टपाल खात्यामार्फत 'अखिल भारतीय पत्र लेखन प्रतियोगिता'

यवतमाळ, दि२७ जिमाका:- भारतीय टपाल खात्यातर्फे सर्व वयोगटातील व्यक्तींकरिता “ढाई आखर” ही पत्रलेखन प्रतियोगिता आयोजित करण्यात आली आहे. ही प्रतियोगिता 18 वर्षाच्या आतील आणि 18 वर्षाच्या वरील अशा दोन वयोगटामध्ये होणार असून प्रतियोगीतेचा विषय “व्हीजन फार इंडिया 2047” असा असणार आहे. ही प्रतियोगिता अंतर्देशिय पत्र किंवा लिफाफा श्रेणी यामध्ये होणार आहे. याकरिता अनुक्रमे 500 आणि 1000 शब्द मर्यादा असून पत्रलेखण इंग्रजी / हिन्दी तसेच स्थानिक भाषेमध्ये लिहिण्याची सुविधा दिलेली आहे. प्रतियोगीते करिता राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आकर्षक बक्षीस देण्यात येणार असून, राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार 50 हजार रुपये -, द्वितीय पुरस्कार 25 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये तसेच राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, व्दितीय पुरस्कार 10 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 5000/- असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. दिनांक 1 जुलै 2022 पासून सुरु झालेल्या या प्रतियोगीतेकरिता पत्र पोहोचण्याची अंतिम तारीख 31 ओक्टोंबर 2022 ही असून डिसेंबर 2022 ला अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे. प्रतियोगितेमध्ये भाग घेण्याऱ्यांनी पत्र हस्तलिखित लिहायचे असून “मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र परिमंडळ, मुंबई-400001 या पत्त्यावर पाठवावे, अशी माहिती अधीक्षक डाकघर यवतमाळ विभाग, यवतमाळ यांचे प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली आहे. अखिल भारतीय पत्र लेखन प्रतियोगीतेमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींनी तसेच शालेय विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा. तसेच यवतमाळ जिल्हयातील सर्व शाळा , महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी आपल्या शाळा, महाविद्यालयातील विदयार्थ्यांना या प्रतियोगीतेकरिता प्रोत्याहित करावे असे आवाहन श्री के एन बावनकुळे, अधीक्षक डाकघर, यवतमाळ विभाग यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी