अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात 'जागतिक अन्न दिन' साजरा

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे दिनांक १३ ते १७ ऑक्टोबर, २०२२ दरम्यान जागतिक अन्न सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अन्न पदार्थांची होणारी नासाडी थांबविणे व प्रक्रिया युक्त पदार्थामध्ये त्याचे रुपांतर करून समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत अन्न पोहचविणे हा आहे. विध्यार्थांद्वारे समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे ह्याकरिता महाविद्यालयाच्या वतीने जागतिक अन्न सुरक्षा सप्ताह 2022 चे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांचे हस्ते विविध स्पर्धातील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार व अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त कृष्णराव जयपूरकर तर प्रमुख वक्ते म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे तसेच डॉ. विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक प्रमोद यादगीरवार, डॉ. आशुतोष लाटकर, घनश्याम दांडे, डॉ. जयश्री उघाडे उपस्थित होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याचा सन्मान जर खऱ्या अर्थाने करायचा झाल्यास सध्या स्थितीत होत असलेली अन्नाची नासाडी थांबविणे, प्रक्रियायुक्त पदार्थावर भर देणे, संतुलित व पौष्टिक आहार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविल्यास हाच खर्या अर्थाने शेतकरी वर्गाचा सन्मान असेल असे मत महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. देशपातळीवर व तसेच विदर्भाची कुपोषणाची स्थिती बघता, पौष्टिक व संतुलित अन्नाच्या वापराबाबत प्रोत्साहन देणे इत्यादी बाबींवर अन्न तंत्रज्ञानातील शास्त्रज्ञांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. या संदर्भात कार्य करण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एन. डी. पार्लावार यांनी आव्हान केले. भारतातील उपासमारीचा वाढता आलेख बघता, प्रत्येक घटकापर्यंत पौष्टिक अन्न पुरवठा करण्याकरिता प्रक्रिया युक्त पदार्थावरती जास्तीत जास्त भर देवून अन्न प्रक्रिया, अन्न पॕकेजिंग तंत्रज्ञान, अन्न शीतगृह अध्ययावत तंत्रज्ञानासह विकसित करणे कसे गरजेचे आहे या बद्दल सविस्तर माहिती देवून प्रमुख वक्ते गोपाल माहुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी साक्षी रावते, मेघना तडस, अमिता सुर्यतळे, दर्शना एकलारे आणि आयुष कुमार आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जगदीश सांगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयातील विद्यार्थी कु. सुकन्या अडकीने व आयुष कुमार यांनी केले. उपस्थितांचे आभार चेतन धोटे यांनी व्यक्त केले. डॉ. प्रदिप थोरात, डॉ. निखील सोळंके श्री. आनंद भुसारी, डॉ. विकास पाटील, श्री. विजय नाकाडे, श्री. कृष्णा सावळे, श्री. भुषण जगताप व महाविद्यालयाचे अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी