पदवीधर मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम: सहायक मतदार नोंदणी अधिकारी घोषीत मतदार नाव नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबर पर्यंत

यवतमाळ दि. १२ ऑक्टोबर (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक 2023 चे अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम येत्या 1 ऑक्टोबर पासुन सूरू झाला असून ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मतदार नाव नोंदणी करता येणार आहे. सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले असून मतदारांना नाव नोंदविणे सोईचे व्हावे म्हणून नमुना-18 स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची प्रभागनिहाय नियुक्ती केली आहे. पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशीत अधिकारी यांची प्रभागनिहाय पुढीलप्रमाणे नियुक्ती केलेली आहे. ललित व-हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 4, संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.)- प्रभाग 5 ते 8, सवीता चौधर- पालवे, उपजिल्हाधिकारी विभूसंअ (लाभक्षेत्र)- प्रभाग 9 ते 12, ब्रिजलाल एच. बिबे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) -प्रभाग 13 ते 16, सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लसिका-2)- प्रभाग 17 ते 20, सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी- प्रभाग 21 ते 23, भाग्यश्री देशमुख, तहसिलदार (महसुल)- प्रभाग 24 ते 26, रुपाली बेहरे, तहसिलदार (सा.प्र.) -प्रभाग 27 ते 29, शेखर पुनसे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी याचेकडे यवतमाळ शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, अनिरुध्द बक्षी, उपविभागीय अधिकारी व के.एस. झाल्टे, तहसिलदार यांचेकडे यवतमाळ (ग्रामिण), तसेच उर्वरीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची त्यांचे उपविभाग व तालुक्यात पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता नियुक्ती केलेली आहे. पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक वेळी निवडणूकीपुर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्याने, पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यात (नमुना 18) नविन अर्ज सादर करावेत. प्रत्येक व्यक्ती जी भारताची नागरिक आहे, आणी त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी (म्हणजे पात्रता तारीख) किमान 3 वर्षे आधी भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली आर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र आहे. पदवीधर मतदार यादीमध्ये नोंदणीकरीता मतदारांना नमुना 18 चा अर्ज तहसिल कार्यालयामध्ये तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी