कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील पदविधरांची मतदार यादित नोंद करावी - जिल्हाधिकारी पदवीधर मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम: सहायक मतदार नोंदणी अधिकारी घोषीत *मतदार नाव नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबर पर्यंत यवतमाळ दि. 18 ऑक्टोबर (जिमाका) : संभाव्य अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक - 2023 चे अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सूरू झाला असून 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत मतदार नाव नोंदणी करता येणार आहे. सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकिय निम शासकिय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातिल सर्व पदविधारक कर्मचाऱ्यांची मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित ते बोलत होते. पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक निवडणूकीपुर्वी नव्याने तयार करण्यात येतात. यासाठी पात्र पदवी, पदविकाधारक व्यक्तींनी नमुना १८ या विहित नमुन्यात नविन अर्ज सादर करावेत. भारताची नागरिक असलेली, मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेली आणि 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता दिनांकाच्या किमान 3 वर्षे आधी विद्यापीठाची पदवीधर असलेली प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार म्हणुन नोंदणी करु शकते. मतदार नोंदणीकरीता मतदारांना नमुना १८ तहसिल कार्यालयामध्ये तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर सुध्दा उपलब्ध आहे असे जिल्हाधाकारी यांनी सांगितले. यवतमाळ शहराकरिता मतदारांना नाव नोंदविणे सोईचे व्हावे म्हणून नमुना-१८ स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची प्रभागनिहाय नियुक्ती केली आहे. तर शासकिय कर्मचा-यांसाठी जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी शेखर पुनसे यांची नियुक्ती केली आहे. कार्यालय प्रमुखांनी मतदार नोंदणीसाठी शासकिय कर्मचा-यांकडुन नमुना १८ परिपुर्ण भरुन त्यातील माहितिची खातरजामा करुन प्रत्येक कर्मचा-याच्या अर्जासोबत जोडपत्र ३ भरुन प्राधिकृत करावे. तसेच सर्व कर्मचा-यांचे एकत्रित अर्ज शेखर पुनसे यांचेकडे जमा करावेत. पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांसाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशीत अधिकारी यांची यवतमाळ शहराकरिता प्रभागनिहाय नियुक्ती केलेली आहे ती अशी आहे. ललित व-हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 4, संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.)- प्रभाग 5 ते 8, सवीता चौधर- पालवे, उपजिल्हाधिकारी विभूसंअ (लाभक्षेत्र)- प्रभाग 9 ते 12, ब्रिजलाल एच. बिबे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) -प्रभाग 13 ते 16, सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लसिका-2)- प्रभाग 17 ते 20, सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी- प्रभाग 21 ते 23, भाग्यश्री देशमुख, तहसिलदार (महसुल)- प्रभाग 24 ते 26, रुपाली बेहरे, तहसिलदार (सा.प्र.) -प्रभाग 27 ते 29, शेखर पुनसे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी याचेकडे यवतमाळ शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, अनिरुध्द बक्षी, उपविभागीय अधिकारी व के.एस. झाल्टे, तहसिलदार यांचेकडे यवतमाळ (ग्रामिण), तसेच उर्वरीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची त्यांचे उपविभाग व तालुक्यात पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता नियुक्ती केलेली आहे. पदवीधारकांनी मतदार यादित नाव नोंदवतांना पदवीची गुणपत्रिका स्व प्रमाणित करून राजपत्रित अधिका-यांकडुन प्रमाणित केलेली छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावी. असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे यांनी यावेळी सांगितले.

*मतदार नाव नोंदणीची मुदत ७ नोव्हेंबर पर्यंत यवतमाळ दि. 18 ऑक्टोबर (जिमाका) : संभाव्य अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक - 2023 चे अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सूरू झाला असून 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत मतदार नाव नोंदणी करता येणार आहे. सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकिय निम शासकिय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातिल सर्व पदविधारक कर्मचाऱ्यांची मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित ते बोलत होते. पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक निवडणूकीपुर्वी नव्याने तयार करण्यात येतात. यासाठी पात्र पदवी, पदविकाधारक व्यक्तींनी नमुना १८ या विहित नमुन्यात नविन अर्ज सादर करावेत. भारताची नागरिक असलेली, मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेली आणि 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता दिनांकाच्या किमान 3 वर्षे आधी विद्यापीठाची पदवीधर असलेली प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार म्हणुन नोंदणी करु शकते. मतदार नोंदणीकरीता मतदारांना नमुना १८ तहसिल कार्यालयामध्ये तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर सुध्दा उपलब्ध आहे असे जिल्हाधाकारी यांनी सांगितले. यवतमाळ शहराकरिता मतदारांना नाव नोंदविणे सोईचे व्हावे म्हणून नमुना-१८ स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची प्रभागनिहाय नियुक्ती केली आहे. तर शासकिय कर्मचा-यांसाठी जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी शेखर पुनसे यांची नियुक्ती केली आहे. कार्यालय प्रमुखांनी मतदार नोंदणीसाठी शासकिय कर्मचा-यांकडुन नमुना १८ परिपुर्ण भरुन त्यातील माहितिची खातरजामा करुन प्रत्येक कर्मचा-याच्या अर्जासोबत जोडपत्र ३ भरुन प्राधिकृत करावे. तसेच सर्व कर्मचा-यांचे एकत्रित अर्ज शेखर पुनसे यांचेकडे जमा करावेत. पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांसाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशीत अधिकारी यांची यवतमाळ शहराकरिता प्रभागनिहाय नियुक्ती केलेली आहे ती अशी आहे. ललित व-हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 4, संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.)- प्रभाग 5 ते 8, सवीता चौधर- पालवे, उपजिल्हाधिकारी विभूसंअ (लाभक्षेत्र)- प्रभाग 9 ते 12, ब्रिजलाल एच. बिबे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) -प्रभाग 13 ते 16, सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लसिका-2)- प्रभाग 17 ते 20, सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी- प्रभाग 21 ते 23, भाग्यश्री देशमुख, तहसिलदार (महसुल)- प्रभाग 24 ते 26, रुपाली बेहरे, तहसिलदार (सा.प्र.) -प्रभाग 27 ते 29, शेखर पुनसे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी याचेकडे यवतमाळ शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, अनिरुध्द बक्षी, उपविभागीय अधिकारी व के.एस. झाल्टे, तहसिलदार यांचेकडे यवतमाळ (ग्रामिण), तसेच उर्वरीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची त्यांचे उपविभाग व तालुक्यात पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-18 स्विकारण्याकरीता नियुक्ती केलेली आहे. पदवीधारकांनी मतदार यादित नाव नोंदवतांना पदवीची गुणपत्रिका स्व प्रमाणित करून राजपत्रित अधिका-यांकडुन प्रमाणित केलेली छायांकित प्रत अर्जासोबत सादर करावी. असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी