कापूस पिकावरील आकस्मिक मर रोग नियंत्रण व उपाययोजना

यवतमाळ, दि. 30 सप्टेंबर (जिमाका):- पेरणी नंतर 60 ते 70 दिवसामध्ये कपाशी पीक बहुतेक ठिकाणी पात्या आणि फुले येणाऱ्या अवस्थेमध्ये आहे. यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात पडत असला तरी त्याचे वितरण अनियमित आहे सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे बऱ्याच शेतामध्ये पावसाचे पाणी साचुन असल्याचे आढळून येत आहे सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन या कारणांमुळे पाणी जमिनीत बराच काळ साचून आहे. अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडे पिवळी व मलुल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येत आहेत. आकस्मिक मर रोगांच्या (पॅरविल्ट) प्रार्दुर्भावामुळे कापूस उत्पादकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक अनेक रोगकारक घटकांमुळे दिसून येणाऱ्या मर रोगाच्या तुलनेत आकस्मिक मर रोग हा तुरळक प्रमाणात दिसतो रोगाचे परिणाम व त्यावर होणारा नेमका परिणाम मोजणे अवघड ठरते शास्त्रीय दृष्ट्या सखोल अभ्यासाअंती या विकृती साठी कुठलीही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू, सूत्रकृमी कारणीभूत नसल्याचे दिसून आले आहे. या आकस्मिक मर रोगासाठी बीटी कपाशीसह अनेक संकरित वाण हे देशी कपाशी वाणाच्या तुलनेत अधिक संवेदनशील असल्याचे आढळले आहे. आकस्मिक मर रोगांची कारणे 1. झाडाकडून पोषक अन्नद्रव्याची आणि पाण्याची अधिक आवश्यकता असणे. 2. दीर्घकाळ उच्च तापमान व सूर्यप्रकाशासह पाण्याचा ताण, अतिवृष्टी, सिंचनाद्वारे शेतात अधिक पाणी दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो भारी आणि खोल जमिनीत पाणी साचत असल्याने त्या जमिनी मर रोगास पोषक ठरतात चांगला निचरा होणाऱ्या जमिनीच्या तुलनेमध्ये पाणी साचलेल्या जमिनीत रोगांचे प्रमाण जास्त आढळते लक्षणे आकस्मिक मर (पॅराविल्ड) हा रोग हळू किंवा जलदगतीने विकसित होऊ शकतो रोगांचेप्रमाण झाडाची अधिक वाढ किंवा पात्या फुले आणि बोंडाचे प्रमाण अधिक झाल्यास वाढलेले दिसून येते प्रादुर्भावग्रस्त हिरव्या झाडाच्या हिरव्या पानांवर मर रोगांची लक्षणे दिसतात ती पिवळसर तांबूस किंवा लाल होऊन सुकतात अकाली पानगळ पाने व बोंडसड पण होऊ शकते पानांच्या वाढलेल्या श्वसनामुळे पाने मलूल होतात अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते रोगग्रस्त झाडात ॲथोसायनिन (जांभळा,लाल ) रंगद्रव्याचा विकास झाल्याचे दिसुन येऊ शकते. एकात्मिक व्यवस्थापन शेतात पाण्याचा निचरा होणे अतिशय महत्त्वाचे आहे प्रदीर्घकाळ कमी पाण्याचा ताण पडू देऊ नये झाडाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास सिंचन करावे भारी जमिनीत शेतखताचा आणि रासायनिक खतांचा वापर टाळावा प्रार्दुभावाची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी आळवणी करावी (प्रमाण प्रतिलिटर पाणी) कॉपर ऑक्सिक्‍लोराईड (50% डब्ल्यू पी) 2.5 ग्रॅम अधिक युरिया 10 ग्रॅम किंवा कार्बेन्डा‍झिम (50% डब्ल्यू पी) 2 ग्रॅम अधिक युरिया 10 ग्रॅम (लेबल क्लेम) कपाशीवरील बोंड सडची कारणे मागील दोन वर्षापासून प्रमुख कापूस उत्पादक पट्यात विकसित होणाऱ्या हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या आढळून येत आहे. ही प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये आढळून येते अशा बोंडाच्या बाहेरील भाग निरोगी वाटतो कपाशीवरील बोंड चढण्याचे प्रकार व कारणे - मुख्यता बोंड सडण्याचे दोन प्रकार आढळतात. बोडांच्या बाहेरील पृष्ठभागावरून होणारा संसर्ग- या प्रकारात मुख्यता: मृतजीवी, काही रोगकारक बुरशी व काही प्रमाणात बोंडावरील करपा रोगाला कारणीभूत जिवाणू यांचा समावेश असतो ढगाळ वातावरण, सतत पडणारा पाऊस आणि हवामानातील अधिक आद्रता असे घटक ह्या प्रकारच्या बोंड सडण्याला पोषक असतात बोंडे उमलण्याच्या प्राथमिक अवस्थेत असे प्रकार साधारणता आढळून येतात बहुतेक वेळा बोंडावर बुरशीची वाढ झाल्याचे आढळते ही समस्या प्रामुख्याने कमी प्राणवायू असतांना तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि आंतरिक रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो पावसाळ्यात होणारा संततधार पाऊस ढगाळ हवामान अधिक आर्द्रता, कळयावर व बोंडावरील रस शोषणारे ढेकूण यांचा प्रादुर्भाव या घटकामुळे आंतरिक बोंड सडण्याची समस्या बोंडाच्या बाह्य भागावर बुरशीची वाढ साधारणतः दिसून येत नाही अशी बोंडे फोडून पाहिली असता जिवाणूच्या प्रादुर्भावाने आतील रुई पिवळसर ते गुलाबी तपकिरी रंगाची किंवा डागळलेली दिसून येते बोंडावरील पाकळ्या चिकटुन राहिल्याने बोंडाच्या पृष्ठभागावर ओलसरपणा राहतो अशा ठिकाणी जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते असा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वेळीच कृषी तज्ञाच्या सल्ल्याने नियंत्रणाच्या उपाययोजना अंवलंबाव्यात. बोंडसडवर उपाय योजना बोडांना चिकटून राहिलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढाव्यात त्यामुळे त्या ठिकाणी रोगकारक घटकांची वाढ होणार नाही. पात्या फुले, बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत रस शोषणारे ढेकूण या किडीच्या नियंत्रणासाठी वेळेत योग्य उपाययोजना कराव्यात. सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अतिआद्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण्याच्या व्यवस्थापनासाठी पात्या फुले बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत फवारणी करावी कॉपर ऑक्सिक्‍लोराइड (50 टक्के डब्ल्यूपी )205 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 0.2 ग्रॅम (टॅक मिक्स) बोडांच्या बाहेरील पृष्ठभागावरून होणारा बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझीम 50 टक्के डब्ल्यूपी 1 ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन 50 टक्के डब्ल्यूपी 1 ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन 20 टक्के डब्लु जी 1 ग्रॅम गरजेनुसार पुढील फवारणी पंधरा दिवसांचे अंतराने करावी. अधिक माहितीकरिता कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी