सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-वन सादर करणे साठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- यवतमाळ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे कडून पूरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आलेले आहे. तसेच उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा ) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5(1) व कलम 5(2) अन्वये त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. सप्टेंबर-2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करीता ई-आर-1 या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकिय / निमशासकिय/ खाजगी उद्योजक/ आस्थापना यांनी त्यांचे युझर आय.डी. व पासवर्डच्या माध्यमातून लॉग ईन करुन ऑनलाईन सादर करावयाची आहे व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. ऑनलाईन ई आर – 1 सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा दुरध्वनी क्रमांक 07232-244395 यावर संपर्क साधावा. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर, 2022 आहे. ई-आर 1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी