हत्तीरोग औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ

यवतमाळ ०६ :- आरोग्य विभागामार्फत हत्तीरोग नियंत्रणाकार्यक्रमा अंतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ अंजुमन ऊर्दु हायस्कुल,यवतमाळ येथून सहाय्यक संचालक हिवताप व हत्तीरोग डॉ.कमलेश भंडारी यांचेहस्ते विद्यार्थ्यांना डि.ई.सी.गोळ्या देवुन करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तनवीर शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नावंदीकर, अंजुमन संस्थेचे अध्यक्ष जाफर सादीक गिलाणी, सचिव शोयेब शिवाणी, मुख्याध्यापक अब्दुल रफीक, शगुप्ता मॅडम हे उपस्थितीत होते. ही मोहिम ६ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यातील ८ तालुक्यात यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, झरी, वणी, मारेगाव, राळेगांव व कळंब या भागात राबविण्यात येणार असून सदर मोहिमेत दोन वर्षावरील जोखमिचे व्यक्ती वगळता जवळपास १४.१९ लक्ष जनतेला डि.ई.सी. व अल्बेंडॅझोलची गोळी देण्यात येणार. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात डॉ.तनवीर शेख यांनी हि गोळी घेतल्यामुळे मानवी रक्तामध्ये वाढ होत असलेले मायक्रो फायलेरीया जंतू नष्ट होतात व समुदातील हत्तीरोगाचा जंतूभार कमी होतो व त्याची जननाची सुरू असलेली साखळी तुटते व रूग्ण हत्तीरोग मुक्त होतो अशी माहिती दिली. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ.कमलेश तिवारी यांनी या मोहिमेत सर्वांनी डि.ई.सी.गोळी घेवून हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस चव्हाण यांनी समयोचीत मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष जाफर सादीक गिलाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांना या गोळीचे सेवन करावेच तसेच घरी व आपल्या परिसरातील सर्वांना ही गोळी घेवून आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक मो.नदीम यांनी केले. कार्यक्रमाला हिवताप कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी धिरज पिसे, के.एस.कुळकर्णी, मोहन दहेकर, वसंत लांडे, दिलीप मेश्राम तसेच मोठ्या प्रमाणात शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी