आर्णी व मेटीखेडा येथील पोलीस स्टेशनचा प्रश्न निकाली काढा पालकमंत्री संजय राठोड यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन

यवतमाळ दि. १२ : जिल्ह्यातील आर्णी व मेटीखेडा येथील पोलीस स्टेशनच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. ना. संजय राठोड यांच्या निवेदनानुसार आर्णी येथील पोलीस स्टेशन करीता जागेच्या कमतरतेमुळे समस्या निर्माण होत आहेत. सद्यस्थितीत आर्णी, नगर परिषद हद्दीतील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आल्यामुळे एकूण ५७ गुंठे जागा उपलब्ध झालेली आहे. सदर जागेवर मच्छी मार्केटसाठी असलेले आरक्षण रद्द करून आर्णी पोलीस स्टेशन या सार्वजनिक उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. सदर प्रस्तावावर त्वरीत कार्यवाही करण्याबाबत आदेश व्हावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. तसेच मेटीखेडा येथे नविन पोलीस स्टेशन निर्माण करणे आवश्यक असून त्यामुळे जवळपास ६२ गावातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. मेटीखेडा या ठिकाणी महसूल व वन विभागाची देखील कार्यालये कार्यरत आहेत व नविन पोलीस स्टेशनसाठी शासकीय जागा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे मेटीखेडा येथे नविन पोलीस स्टेशन निर्माण करण्यासाठी मान्यता देण्याची विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी