दिग्रस येथील पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 179 उमेदवारांची निवड

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि बापूरावजी बुटले कला, नारायण भट वाणिज्य आणि बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय, दिग्रस यांचे संयुक्त विद्यमानाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद दुबे उपस्थित होते. तसेच डी. व्ही. एस. पी. मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार बंग, बुटले कॉलेजचे प्राचार्य कॅ. व्ही. एल. खळतकर आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे सदर रोजगार मेळाव्यास उपस्थित होत्या. सदर रोजगार मेळाव्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद दुबे यांनी मार्गदर्शन केले आणि मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी या रोजगार मेळाव्यात एकूण 13 नामांकित कंपन्या त्यांच्याकडील एकूण 1239 रिक्त पदाकरिता मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार असल्याचे सांगितले आणि त्याचा फायदा उमेदवारांनी आवर्जून घेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आपले करिअर घडवण्याकरिता प्राप्त संधीचे सोने करण्याचे सांगून उमेदवारांना प्रोत्साहीत केले. या रोजगार मेळाव्याचा एकूण 655 उमेदवारांनी लाभ घेतला आहे. तसेच या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 179 उमेदवाराची प्राथमिक निवड झालेली आहे. सदर रोजगार मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा.पी. एम. दिवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ. मंजुषा जगताप यांनी केले. रोजगार मेळावा यशस्वी करण्याकरिता बुटले कॉलेज मधील प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ कार्यालयाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी