शालेय क्रीडा स्पर्धेतंर्गत 93 खेळाचे आयोजन संयोजकांची सभा दिनांक 7 ऑक्टोबरला

यवतमाळ, दि. 3 ऑक्टोबर (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022 - 23 या वर्षात एकूण 93 खेळांच्या तालुका व जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार असून येत्या 7 ऑक्टोबर रोजी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुका संयोजक यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या स्पधेत आर्चरी, मैदानी खेळ, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलींग (रोडरेस ट्रक - थेट निवडचाचणी ), डॉटबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टीक, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कराटे, खो-खो, किकबॉक्सिंग, लॉनटेनिस, मल्लखांब, नेहरू हॉकी, नेटबॉल, रायफल शूटिंग, रोलबॉल, रोलर स्केटिंग / रोलर हॉकी, शूटिंगबॉल, सिकई मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, स्क्वॅश, सुब्रतो मुखर्जी फुटबॉल, जलतरण व डायव्हिंग / वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, थ्रोबॉल, हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती फ्री स्टाईल व ग्रीको रोमन, वुशु, योगासन, रग्बी, मॉडर्न पेंटॅथेलॉन, सेपक टकरा, सॉफ्टटेनिस, टेनिक्वाईट, आट्यापाट्या, आष्टे डू आखाडा, युनिफाईड, कुडो, स्पीडबॉल, टेंग सू डो, फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलींग, फ्लोअर बॉल, थायबॉक्सिंग, हाफकीडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलंबस, वुडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॅलीबॉल, टारगेट बॉल, टेनिस क्रिकेट, जीत कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन्दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलींग पेंन्टॅक्यु, लंगडी, जंप रोप, स्पोर्टडांस, चॉकबॉल, चायक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युझिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट या खेळांचा समावेश आहे. उपरोक्त स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुका संयोजक तसेच एकवीध खेळांच्या विविध क्रीडा संघटक, अध्यक्ष किंवा सचिव यांची सभा 7 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी, यवतमाळ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. विविध क्रीडा संघटनांचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी या सभेस येताना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची सलग्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जिल्हा संघटनेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र, घटना, सभासद यादी इत्यादी कागदपत्रे सोबत आणावी. व व्यक्तीश: उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपडे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी