रस्त्यावरील अपघातप्रवण ब्लॅक पॉइंट सुरक्षीत करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

रस्ता सुरक्षा समितीचा आढावा Ø शहरातील चौकात ट्राफीक सिग्नल लागणार Ø निवडक ठिकाणी कॅमेराद्वारे इ-चलान Ø रस्त्यावर खाजगी बस उभी केल्यास कारवाई Ø संविधान चौकातील प्रवासी थांबा नेताजी चौकात Ø खराब रस्त्यांमुळे अपघातास यंत्रणा दोषी यवतमाळ, दि. 15 ऑक्टोबर (जिमाका) :- एकाच ठिकाणी नेहमी ॲक्सीडेंट घडणारे ब्लॅक स्पॉट शोधून ते सुरक्षीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत दिले. नगरपालीका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतुक पोलीस या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. अपघात घडू नये यासाठी रस्त्यावर आवश्यक तेथे दिशादर्शक व नामफलक लावणे, सुरक्षा मार्कींग चिन्ह, झेब्रा क्रॉसिंग मार्कींग, स्पीड ब्रेकर, रेडियम चे पट्टे, याबाबत संबंधीत रस्त्या ज्या यंत्रणेच्या अख्त्यारित येतो त्यांनी कार्यवाही करावी. खराब रस्त्यांमुळे अपघात झाल्यास संबंधीत यंत्रणेला दोषी ठरविण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रोजेक्ट डायरेक्टर हर्षित पारीक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकरे, नगरपालीकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, विशेष प्रकल्प चे कार्यकारी अभियंता श्री. अडचुले, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव खंदारे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. अपघाताचे शास्रोक्त विश्लेषन करण्यासाठी व रस्ते अपघाताचा डाटाबेस तयार करण्यासाठी आय.आर.ए.डी. या ॲपवर पोलीस विभागाकडून अपघाताची माहिती अपलोड करण्यात येते. यात जानेवारी-2021 पासून यवतमाळमधील 951 अपघातांचा डाटा भरण्यात आला आहे. त्यानुसार नेहमी घडणाऱ्या अपघाताचे स्थळ निश्चित करावे व तेथे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. केलेल्या कार्यवाहीसंबधी पुढील महिण्याच्या बैठकीत आढावा घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यवतमाळ शहरातील संविधान चौक हा सर्वाधिक अपघाचे स्थळ आहे. या चौकात पाच रस्ते एकत्र आले आहे. हा चौक अतिक्रमणपासून मोकळा करण्यात यावा. चौकात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी तेथे कोणतेही प्रवासी वाहन थांबविल्या जाऊ नये, त्याऐवजी नेताजी चौक येथे प्रवासी थांबा देण्यात यावा. संविधान चौक, एल.आय.सी. चौक, स्टेट बँक चौक व इतर महत्वाच्या निवडक चौकात ट्राफीक सिग्नल व कॅमेरे लावण्यात यावे. शहर वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी मुंबई, नागपूर शहराच्या धर्तीवर चौकातील कॅमेराद्वारे नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनाचे ओळख पटवून त्यांना ऑनलाईन इ-चलान जाईल अशी यंत्रणा सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. आर.टी.ओ., ट्राफीक पोलीस व नगरपरिषद यांनी ट्रव्हल पाँईट योग्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याबाबचा मुद्दा तातडीने निकाली काढावा. सध्याच्या ट्रव्हल पाँईटच्या ठिकाणी त्यांच्या आरक्षीत जागेवरच बस उभी राहावी. रस्त्यावर कोणतीही ट्रव्हल बस उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. संबंधीत कंपनीने आपल्या प्रत्येक ट्रव्हलबस मधील चालकाचे कॅबीनमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा तसेच जी.पी.एस. यंत्रणा लावाने बंधनकारक करावे. बसमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांचे सि.सि.टि.व्ही फुटेज थेट संबंधीत कंपनीचे कार्यालयात दिसावे. आर.टी.ओ. ने रॅन्डमली या बसेसची पाहणी करावी व क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणाऱ्यांवर तसेच सनासुदीच्या काळात मर्यादेपेक्षा जादा तिकीटदर आकारणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. शहरात नो-पार्किंग व पार्कींग झोन तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. समता मैदान, आझाद मैदान, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व विविध शाळेच्या मैदानावर मर्यादित वेळेनंतर अनावश्यक गर्दी दिसणार नाही व तेथे अनैतिक कामे होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे तसेच ब्लॅक पॉईटवर ट्राफीक पोलीसांनी वाहतुक नियंत्रीत करण्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या एन्ट्री पॉईंटवर अनेक ठिकाणीची राँगसाईड वाहतुकीला लगाम लावण्याचे व तेथे योग्य मार्ग उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी