‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्य ‘रिडींग मॅरॉथॉन स्पर्धा’

यवतमाळ, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका):- माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असून यानिमित्त सर्व नागरिकांसाठी “रीडिंग मॅरेथॉन स्पर्धा” (वाचन मॅरेथॉन स्पर्धा) चे आयोजन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या ग्रंथालयात दिनांक 15 ऑक्टोबर 2022 च्या पूर्वी आपले नावाची नोंदणी करावयाची आहे. तसेच आपण कोणते पुस्तक वाचन करणार आहोत, ह्या बाबतची माहिती ग्रंथालय व्यवस्थापक यांचे कडे द्यावी. नाव नोंदणी केलेल्या ग्रंथालयात आपले स्वतःचे पुस्तक असेल तर ते पुस्तक किंवा ग्रंथालयातील एक पुस्तक प्राप्त करून घेऊन सकाळी 8 वाजतापासून पुस्तक वाचनाची सुरुवात करावी. सहभागी स्पर्धक जे पुस्तक वाचन करतील त्यातील ठळक बाबींची नोंद एका कागदावर लिहून काढावयाची आहे ते संपूर्ण पुस्तक वाचून त्यांनी काढण्यात आलेल्या नोंदीचे कागद ते ग्रंथालयात देतील “रीडिंग मॅरॅथॉन” मध्ये सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल व ज्या स्पर्धंकाचे पुस्तक वाचून नोंद (नोंट्स) काढण्यात आले त्यातील चांगल्या नोंदी (नोंट्स) काढलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी