अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिवस” संपन्न

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भारतरत्न तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकरिता पुस्तक पुनरावलोकन लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षण विभाग प्रमुख तथा रासेयो कार्यकारी अधिकारी डॉ. जयश्री उघाडे ह्या उपस्थिती होत्या. याप्रसंगी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथाचे योगदान विषद करून वाचनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री उघाडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. “वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे. वाचन संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचा महत्वपूर्ण उपाय आहे. वाचन ही जीवनभर पुरणारी ज्ञान संपदा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. भुषण जगताप यांनी केले. तसेच डॉ. प्रदिप थोरात, डॉ. निखील सोळंके श्री. आनंद भुसारी, डॉ. जगदीश सांगळे, डॉ. विकास पाटील, प्रा. विजय नाकाडे, प्रा. कृष्णा सावळे, भारती मेश्राम, अनिता उमाटे यांच्या सहकार्याने ग्रंथालय विभाग येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास व स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला असल्याचे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी