पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 143 उमेदवारांची निवड

यवतमाळ दि. 03 ऑक्टोबर (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नेहरू महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू विद्यालयात पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून परमानंदजी अग्रवाल तर उद्घाटक म्हणून रवि अग्रवाल तसेच कौशल्य विकासच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त वैशाली एस.पवार, मजहर खान पठाण, राजेंद्रजी चिरडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. डी. वडते उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना उद्‌घाटक रवि अग्रवाल यांनी, स्वयंरोजगारातून समाज घडतो आणि राष्ट्राची निर्मीती होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे लक्ष पुरवून उद्योजक बनले पाहिजे असे सांगितले. यावेळी रोजगार मेळ्याव्यात - उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, यवतमाळ, नवकिसान बायो प्लॅनटेक प्रा.लि. नांदेड, नवभारत फर्टिलायझर प्रा. लि. अमरावती, तिरुमला इंडस्ट्रीयल आणि अलाइड सर्व्हिसेस ग्रुप, डिस्टील एज्युकेशन प्रा.लि. नागपुर, टि. एम.ऑटोमोटीव्ह पुणे, कालिबर बिसनेस सपोर्ट सर्व्हिसेस प्रा.लिमीटेड नागपुर, हायटेक इजीं. लि.शिरवड जि. सातारा, नेट अँबीट नागपुर, स्वतंत्र मायक्रोफिन प्रा· लि.यवतमाळ या सर्व कंपनी मार्फत एकूण 457 रिक्त पदांकरिता मुलाखती घेण्यात आल्यात व मेळाव्याच्या ठिकाणी एकूण 321 उमेदवारांनी नोंदणी केलेली असून यापैकी 143 उमेदवारांची प्राथमिक निवड उपरोक्त कंपनीमार्फत करण्यात आली. तसेच या मेळावा मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ , वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ , महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त विकास महामंडळ अशी एकूण 4 विविध महामंडळे सहभागी होवून उपस्थित उमेदवारांना महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून परमानंदजी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगितला तसेच श्रम आणि प्रामाणिकपणा यामुळे व्यक्ती यशस्वी होऊ शकतो असे सांगितले. प्राचार्य डॉ. एम.डी. वडते यांनी विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमा व्यतिरिक्त रोजगार निर्मीती करण्यासाठी अवांतर वाचन करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. डी.जे.भगत यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. एस.के.इंगळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचलन प्रा.आर.एस. गुल्हाने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी