*सारथी अंतर्गत मराठा, कुणबी उमेदवारांना मोफत प्रशिक्षण*

यवतमाळ, दि.२६ (जिमाका) : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी अंतर्गत मराठा, कुणबी मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सारथीच्या लक्षित गटातील मराठा, कुणबी मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील एकूण २० हजार उमेदवारांना मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील स्कील इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टर मधील अभ्यासक्रमाकरिता ५ स्टार, ४ स्टार व ३ स्टार प्रशिक्षण संस्थांना सोसायटी मार्फत प्रशिक्षण लक्ष वाटप करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा या गटातील उमेदवारांनी लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवर जाऊन https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi किंवा दिलेल्या QR कोडच्या माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर रोजगार स्वयंरोजगार संधीचा लाभ सुद्धा याद्वारे उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या गटातील उमेदवारांनी लिंकवर जाऊन किंवा QR कोडच्या माध्यमातून अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा आणि जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी उमेदवारांना नोंदणीकरिता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन यवतमाळ येथे किंवा ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी