शासकीय वस्तीगृह प्रवेशाचे अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.११ जुलै(जिमाका):-सामाजिक व न्याय विभाग समाज कल्याण यवतमाळ यांच्या वतीने सन २०२३-२४ या शैक्षिणिक वर्षाकरिता मुला/मुलींच्या शासकीय वस्तीगृह प्रवेशाचे वेळापत्रक जारी करण्यात आले असून ही प्रवेश प्रक्रिया पुर्वी प्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण १८ शासकीय वस्तीगृह असून यामध्ये ९ मुलांचे ९ मुलींचे आहेत.यापैकी यवतमाळ येथे १ मुलांचे व २ मुलींचे असून मुलांचे नेर १,राळेगाव१,घाटंजी १,पांढरकवडा १,वणी १,उमरखेड१,पुसद १,ईसापूर-दिग्रस १ तर मुलींचे घाटंजी १,वणी १,आर्णी १,पुसद १,उमरखेड १,दिग्रस १,दारव्हा १,असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृहाममध्येच पुढील कालावधीत अर्ज करावयाची आहेत.शालेय विद्यार्थांसाठी १२ जुलै २०२३ पर्यंत तर इयत्ता १० वी,व ११ नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) ३१ जुलै २०२३ पर्यंत तर बी.ए./बी.कॉम/बि.एस.सी.अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम./एम.एस.सी.असे पदवी नंतरचे अभ्यासक्रम (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून)३१ जुलै २०२३ पर्यंत ऑफ लाईन पध्दतीने अर्ज करावे,तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वस्तीगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल,असे सहायक आयुक्त समाज,कल्याण भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी