पांढरकवडा येथील पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखले ऑनलाईन वितरित

यवतमाळ,दि 18 जुलै (जिमाका) :- पांढरकवडा येथील अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून ऑनलाईन वितरित करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी स्वतः चे प्रमाणपत्र https://itdp-pandharkawada.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन सहाय‍क जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा ता. केळापूर जि. यवतमाळ या कार्यालयाकड़े अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला वितरित करण्याकरिता पर्यंत 1414 अर्ज प्राप्त झालेले आहे. अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला वितरित करण्याची कार्यवाही ही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत असून आतापर्यंत एकूण 1 हजार 111 रहिवासी दाखले मंजूर झालेले आहेत. हे दाखले संबंधित उमेदवारांनी स्वतः चे प्रमाणपत्र स्वतः मोबईलवरुन प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे. प्रमाणपत्र डाऊनलोड करतांना काही अडचण निर्माण झाल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 07235-227436 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सहाय्य‍क जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी