नोंदणीकृत सेवा सोसायटींनी काम वाटपासाठी प्रस्ताव सादर करावे

यवतमाळ, दि 13 (जिमाका) : बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीच्यावतीने पात्र नोंदणीकृत सेवा सोसायटीला कामाचे वाटप केले जाते. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगाव, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुसद येथे सफाईगार कामाकरीता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटप करणेसंदर्भात प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगाव या संस्थेने ठरवून दिलेल्या दोन पुर्णवेळ सफाई कामगार करीता, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुसद येथे प्रत्येकी एक-एक या प्रमाणे कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी या कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केलेले आहे. अशा संस्थांनी वरील कामाबाबत आपले प्रस्ताव दि. २१ जुलै पर्यंत सादर करावे. आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, विद्या शितोळे यांनी कळविले आहे. प्रस्तावासोबत संस्थेचे अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र, सन २०२२-२३ या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट, मागील तिन महिण्यांचे बँकेचे स्टेटमेंट, सर्व सदस्यांची अद्ययावत यादी व सेवायोजन नोंदणी कार्ड जोडणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी