सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-१ सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.12 जुलै (जिमाका):-कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे कडून पूरविण्यात येणा-या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आले असून उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय,(रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ व नियमावली १९६० कलम ५ (१) व कलम ५ (२) अन्वये त्रैमासिक ई-आर १ ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने माहे एप्रिल-२०२३ ते माहे जुन २०२३ अखेर संपणा-या त्रैमासिक करीता ई-आर १ या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकिय,निमशासकिय,खाजगी उद्योजक,आस्थापना यांनी त्यांचे युझर आय डी. व पासवर्डच्या माध्यमातून लॉग-ईन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे, व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. ऑनलाईन ई-आर १ सादर करतांना काही समस्या येत असल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर ०७२३२-२४४३९५ संपर्क साधावा.तसेच ई-आर १ सादर करण्याची अंतिम मुदत माहे जुलै २०२३ आहे.ई-आर १ ऑनलाईन सादर न करणा-या कसूरदार आस्थापनावर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.याची कृपया नोंद घेण्यात यावी,असे सहायक आयुक्त, विद्या शितोळे,यांनी कळविलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी