तहसिल कार्यालय यवतमाळ येथे कोतवाल पदासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.११ जुलै (जिमाका):-तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे रिक्त असलेल्या पदाच्या ८० टक्के पदे ही सरळसेवा भरती ने भरण्यात येणार आहे.यामध्ये एकूण ९ पदापैकी ३ पदे महिलांकरिता तर ६ पदे ही अनुसुचित जाती,भटक्या जमाती भज-क भज-ड व, इतर मागास वर्ग व खुला तसेच आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) करीता राखीव आहेत. यामध्ये पारवा,कापरा,यवतमाळ,बोरीगोसावी,लोहारा,वडगाव रोड,येळाबारा,आकपुरी,हिवरी या गावाकरीता भरण्यात येणार आहे.त्याकरीता अर्ज दि.१२ जुलै ते २१ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजुन १५ मिनिटापर्यंत तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे सादर करता येईल.प्राप्त अर्जाचे अनुषंगाने लेखी परीक्षा रविवार दि.३० जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.अर्जचा नमुना तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे उपरोक्त कालावधीत मिळेल.अर्ज फी रू.१० व अर्ज दाखल करते वेळी परीक्षा शुल्क खुला प्रवर्गाकरीता ५०० रुपये व इतर राखीव सर्व प्रवर्गाकरीता २५० रूपये परीक्षा शुल्क भरणा रोखीने करणे आवश्यक राहील.अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह स्वत:हा कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे पोस्टाने अर्ज स्विकारण्यात येणार नाही. अधिक माहिती करीता तहसिल कार्यालय,यवतमाळ,उपविभागीय अधिकारी यवतमाळ,संबंधित तलाठी साजा व संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तसेच नगर परिषद,यवतमाळ यांचे कार्यालयाचे सुचना फलकावर जाहीरनामा,पात्रता अटी व शर्तीसह प्रसिद्ध केला आहे.तर तहसिल कार्यालय,यवतमाळ येथे दि. १२ जुलै ते २१ जुलै २०२३ या कालावधीतील प्राप्त अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.अंतिम तारखे नंतर प्राप्त अर्ज स्विकारण्यात येणार नाही.तरी सर्व संबंधित पात्र उमेदवारांनी अर्जदाखल करण्याचे आवाहन तहसिलदार डॉ.योगेश देशमुश यांनी केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी