विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे

यवतमाळ,दि.११,जुलै(जिमाका):-राजर्षी शाहू महाराज जयंती तसेच सामाजिक न्याय पर्व अंतर्गत सन-2023-24 या शैक्षणिक वर्षात 11,वी.व12,वी.विज्ञान मध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थीकरींता समितीव्दारे यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात शिबीरे आयोजीत केलेली असुन शिबीरस्थळी 11 वी,व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशीत विदयार्थीनी आपल्या ऑनलाईन भरलेला अर्ज त्या ठिकाणी सादर करावा.सदर शिबीराची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत असणार असून शिबिरात विदयार्थीना मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. सदर शिबीरे हे तालुका निहाय पुढील प्रमाणे दि.१७ जुलै,कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय सेवादास नगर, आर्णी.दि.१३ जुलै रोजी राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,झरी-झामणी दि.१८जुलै,रोजी श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविदयालय,पुसद दि.१९ जुलै,शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविदयालय,केळापुर,(पांढरकवडा)दि.२० जुलै,गोपिकाबाई सितारामजी गावंडे कॉलेज,महाविदयालय,उमरखेड,दि.२५ जुलै लोकमान्य टिळक महाविदयालय,वणी,दि.२६ जुलै शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविदयालय दारव्हा,दि.२७ जुलै मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय,महागाव,तसेच दि.२८ जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पळसवाडी कॅम्प,दरव्हा रोड यवतमाळ.येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात विदयार्थी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त्‍ करुण घेण्याकरीता पात्र राहतील सन 2023-24 मधील 11 वी‍ व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशीत विदयार्थी यांनी https:// bartievalidity. Maharashtra .gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करुन परिपुर्ण भरलेला अर्ज व मुळ कागदपत्रासह उपस्थीत रहावे,अर्जदाराचा जातीचा दाखला यवतमाळ जिल्हातील असावा व अर्जदार हा अनुसूचित जाती (SC),विमुक्त जाती भटक्या जमाती(VJNT),विशेष मागासवर्ग (SBC) व इतर मागासप्रवर्ग (OBC) याच प्रवर्गाचे अर्ज समितीकडून स्वीकारले जातील व त्याचे पडताळणी केली जाईल.अधिक महितीकरीता विदयार्थीनी आपल्या महाविदयालातील प्राचार्य यांचेशी संपर्क करावा.तसेच ज्या विदयार्थीचे अर्ज परिपुर्ण असतील त्या विदयार्थीना त्याच ठिकाणी आपले जात वैधता प्रमाणपत्र समितीकडुन देण्याचा समितीचा मानस आहे.परिपुर्ण अर्जाकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रे व पुराव्याच्या यादीकरिता https://yavatmal.gov.in/ notice-category/announcements/ या ठिकाणी भेट देण्यात यावी त्यानुसार कागदपत्रे सादर करावी, वरीलप्रमाणे प्रत्येक उपविभागात एक या प्रमाणे शिबीरे आयोजीत केलेली असुन सदर शिबीरात विदयार्थीना मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.सदर शिबीराचा मुळ उददेश हा आहे की, यवतमाळ जिल्हातील एकही विदयार्थी जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासुन वंचीत राहु नये हा आहे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळदारे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी