जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागामार्फत कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन

यवतमाळ,दि. ११ जुलै (जिमाका):-जिल्ह्यातील युवक युवतींना उद्योगांच्या मागणीनुसार आधारित (Demand Driven) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२३ दरम्यान कौशल्याची मागणी सर्व्हेक्षणमोहिम आणि उद्योगांची कुशल मनुष्यबळ मागणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगानेखालील दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ या कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे. कौशल्याची मागणी सर्वेक्षण (Skill Needs Assessment Survey)-जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,तंत्रनिकेतन,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी,शालेय,महाविद्यालयीन शिक्षणातून गळती झालेले,शिक्षण सोडलेले,नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार तथापि,समाजातील वंचित घटकातील उमेदवारयांना त्यांना आवश्यक असलेल्या,ज्या क्षेत्रात आवड असलेल्या कौशल्याची निवडकरणे करिता खालील गुगल फॉर्म दि. ३१ जुलै,२०२३ पर्यंत जिल्ह्यातील उक्त सर्व विद्यार्थ्यांना भरणे करीता याव्दारे विनंती करण्यात येत आहे.Student Skill Need Assessment GoogleForm Link:- https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 उद्योगांच्या मनुष्यबळांमध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी (Mapping of Skill requirement in manpower of industries)-जिल्हयातील उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुक्ष्म,लघु आणि मोठ्या उद्योग क्षेत्रामध्ये कुशल,अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉबरोल अभ्यासक्रमनिहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज जिल्ह्यातील उद्योजक,इंडस्ट्रीज,इंडस्ट्रीज असोशिएशन,प्लेसमेंट एजन्सीज औद्योगिक आस्थापनी गरज नोंदविल्यास त्या कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करणे शक्य होईल.या अनुषंगाने अधिक माहिताकरिता कौशल्य विकास समन्वयक प्रशांत ढेपे यांच्याशी संपर्क साधावा किंवा ९६५७५४१६३७,८३७९८९८७९८ या क्रमांकावर या विषयाची अधिक माहिती घेता येईल.असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी