सर्वांच्या सहकार्यानेच चांगले काम करता आले - अमोल येडगे Ø जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निरोप Ø नवीन जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांचे स्वागत

यवतमाळ, दि.24 (जिमाका) : यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो तेव्हा कोविडची आपत्कालीन परिस्थिती होती. आता येथून जातांना देखील पुरपरिस्थिती आहे. कोविड आणि पुरपरिस्थीतीसारख्या प्रसंगी केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच चांगले काम करता आले, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. श्री.येडगे यांची बदली झाल्याने त्यांना निरोप व नवीन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्या स्वागताचा कार्यक्रम महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमोल येडगे, डॅा.पंकज आशिया यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत तथा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गेल्या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासोबतच त्यांची कामे कमी त्रासात, कमी वेळेत कशी होतील, याकडे प्राधान्याने लक्ष दिले. प्रशासनात काम करतांना सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी आपण काम करत असतो. यापुढे देखील सर्वांनी या उद्देशाने काम करत रहावे, अशा शुभेच्छा त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेले काम आपण सर्वांनी मिळून पुढे नेऊ, असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना नवीन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी व्यक्त केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे यांनी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. येडगे सरांच्या कार्यकाळात महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेले चांगले काम यापुढे देखील सर्वांनी मिळून करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी मावळते व नवीन अशा दोनही जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी केले. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन मावळते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निरोप दिला

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी