आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. १३ (जिमाका) : आदिवासी मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या विविध वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ईच्छूक विद्याथ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलींचे शासकीय वसतीगृह, दारव्हा तसेच मुलांचे शासकीय वसतीगृह, सावळी सदोबा व मुलांचे आर्णी येथील वसतिगृहात सत्र 2023-24 करिता प्रवेश देण्यात येणार आहे. वर्ग 7 वी, 10 वी, 12 वी. पास अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आपले अर्ज https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करावे. वसतीगृह क्षमता दारव्हा 125, सावळी सदोबा 75 व आर्णि 75 इतकी असून विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांना निशुल्क उत्तम राहण्याची व भोजनाची व्यवस्था, निर्वाह भत्ता व इतर सुख सुविधा पुरविण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे डीबीटीद्वारे रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन शासकीय आदिवासी मुलींचे व मुलांचे वसतीगृह दारव्हा, सदोबा सावळी तसेच आर्णी येथील गृहपाल यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस