मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत

यवतमाळ,दि.19जुलै.(जिमाका):- समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृतीचा लाभ मिळण्यासाठी महाविद्यालयामार्फत ३१ जुलै,२०२३ पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी अर्ज करण्याअगोदर महाडिबीटीच्या http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर त्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन २०२२-२३ वर्षसाठीचे अर्ज भरावेत. परिपूर्ण भरलेले अर्ज मूळ टिसीसह दि.३१ जुलै,२०२३ पूर्वी सादर करावे. तसेच सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील नूतनीकरण शिष्यवृतीचे अर्ज दि.३१ जुलै,२०२३ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करावे. विद्यार्थी या लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहणार आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येवू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंदणी करुन अर्ज महाविद्यालयास सादर करावे,असे आवाहन सहायक आयुक्त,समाज कल्याण यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती