रास्तभाव दुकान परवाना मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि 26 (जिमाका) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सद्यस्थितीत लोकसंख्येच्या आधारे एकांक संख्येनुसार यवतमाळ तालुक्यातील भोसा, वडगाव, तिवसा या 3 ठिकाणी नव्याने रास्तभाव दुकानांचे प्राधीकारपत्र मंजूर करण्याकरिता नव्याने जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याकरिता नोंदणीकृत बचत गट किंवा सहकारी संस्थांनी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे. रास्तभाव दुकान परवाना प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्याचे नमुद केल्यानुसार संस्था /गट यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यात पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० किंवा संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांना अर्ज करता येणार आहे. या प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाना मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील. विहित नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालय, यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत विक्री व स्विकृत केले जातील. रास्त भाव दुकानाचे अर्ज शंभर रुपये चलानाद्वारे भरणा करून संबंधित तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून घेता येईल. अर्ज विक्री व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत दि 17 ऑगस्ट 2023 पर्यंत राहील. यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी पवार यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी