संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.19 जुलै.(जिमाका):- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार, बोर, होलार, मोची इत्यादीच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध कर्ज योजना राबविल्या जात आहेत. या कर्ज योजनेंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. महामंडळामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य व केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाच्या (एन.एस.एफ.डी.सी.) योजना राबविण्यात येत असून ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत लघु उद्योग १ लाख रुपये, १.५० लाख रुपये व २ लाख रुपये, चर्मोद्योग २ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी ५० हजार रुपये या योजनांसाठी मागील प्रलंबित नरस्तीकरिता २२.२१ कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महामंडळाच्या मुदती कर्ज योजनेंतर्गत लघु उद्योग ५लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी १.४० लाख रुपये तसेच नवीन महिला अधिकारीता योजना ५ लाख रुपये मंजूर झालेल्या आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये २० लाख रुपये, विदेशामध्ये ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. अधिक माहिती नजीकच्या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी