यवतमाळ जिल्ह्यात आठवड्याभरात जोरदार पावसाचा इशारा नागरिकांनी सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सूचना

यवतमाळ,दि.१९ (जिमाका): नागपूर येथील हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २२ जुलै २०२३ या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याअनुषांगाने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार बुधवार दि.१९ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दाखविण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व तालुका यंत्रणांनी आपापल्या स्तरावरून नागरिकांना सूचना द्याव्यात असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. नागरिकांना सूचना हवामान खात्याने नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार संरक्षणात्मक कपडे घालावे आणि घरातच आश्रय घ्यावा. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहावे. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे,सखल भाग आणि जिथे पाणी साठते ते टाळा ते अनपेक्षितपणे पूर किंवा ओव्हरफ्लो होऊ शकतात.खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहन चालवणे टाळा.शक्य असल्यास,पार्क करा आणि तुमचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी पाऊस कमी होईपर्यंत किंवा थांबेपर्यंत प्रतीक्षा करा.पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका.पाणी दिसते त्यापेक्षा खोल आणि मजबूत असू शकते आणि त्यात मोडतोड,तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू,भांडे छिद्र किंवा विजेच्या तारा असू शकतात.पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहा.फ्लॅश पूर चेतावणी आणि अद्यतनांसाठी सतर्कता आणि हवामान अहवालांचे निरीक्षण करावे,पाऊस येत असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी पोहचावे,टिनपत्रे असलेल्या शेडचा,जिर्ण इमारतीचा आश्रय घेऊ नये. आपण शेतात असल्यास,पाऊसाचा अंदाज,आभाळ असल्यास तात्काळ घराकडे प्रस्थान करावे किंवा मजबूत अशा सुरक्षित स्थळाचा आश्रय घ्यावा,वाहन चालवित असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घेऊन स्वत:जवळील मोबाईल बंद करण्यात यावे,जेणेकरून आपल्याकडे विज आकर्षित होणार नाही.विजेच्या वस्तूंशी संपर्क ठेवू नये व त्यापासुन दुर राहावे,वादळी पाऊस व विजांचा कडकडाट सुरू असल्यास अशावेळी घरातच राहावे,आपल्या सभोवताल असलेली किडलेली झाडे/ तुटलेल्या फांदया काडुन टाकाव्यात जेणेकरून विज पडुन किंवा वाळवा यापुर्वी झाडे पडून नुकसान होणार नाही.,या कालावधीत सर्व विद्युत उपकरणे अनप्लग करून घ्यावे,तसेच टिन पत्रे व मेटल शिट असलेल्या दूर रहावे,तसेच झाडा खाली आसरा घेऊ नये,वादळाने नुकसान झालेल्या भागापासून घरापासुन दुर राहावे,पडलेल्या झाडापासून पडलेल्या विज तारापासुन दुर रहावे. मौसम विभाग,नागपूर यांनी निर्गमित केलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील ४ दिवस विजांच्या कडकडासह पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे.तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीस ठेवलेले धान्य विक्रीस वेळ असल्यास धान्यावर ताळपत्री आच्छादन तयार करून सुस्थितीत ठेवावे जेणेकरून गारपिट किंवा वादळी पाऊस आल्यास धान्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी