शेतकऱ्यांसाठी ‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी’ स्पर्धा
* प्रथम दहा हजार, व्दितीय सात हजार, तृतीय पाच हजारांचे बक्षीस
यवतमाळ, दि. 2 : बळीराजा चेतना अभियानातर्फे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता ‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
यामध्‍ये शेतकऱ्यांसाठी शेती, पिके, मनोधैर्य वाढविण्‍यासाठी उपाय, किड नियंत्रण, माती परीक्षण, विमा अशा शेती आणि त्‍यांच्‍याशी निगडीत प्रश्‍नोत्‍तरे या स्‍पर्धेत विचारण्‍यात येणार आहे. ही स्‍पर्धा १ ते १० सष्‍टेंबर २०१६ या दरम्‍यान होणार आहे. प्रथम दहा हजार रूपये , द्वितीय सात हजार तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस ठेवण्‍यात आले आहे. यास्‍पर्धेत  जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप  सिंह यांनी केले आहे.
            बळीराजा चेतना अभियानातून शेतकऱ्यांमध्ये जागृती व्‍हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहे. यातील एक उपक्रम म्‍हणून शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक निगडीत ‘बळीराजा प्रेरणा प्रश्‍नोत्‍तरे स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेत शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील सदस्य यात सहभागी होऊ शकणार आहे.
स्‍पर्धेची प्रश्‍नपत्रिका ही शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामार्फत तलाठी, ग्रामसेवक यांच्‍याकडून उपलब्‍ध होणार आहे. या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून प्रश्नांचे उत्तर देताना नकळतच शेतकऱ्यांच्या वागणुकीत बदल होऊन सकारात्मक मनोवृत्ती तयार होऊन जीवनामध्ये होणाऱ्या उन्नतीबद्दलचा बोध होणार आहे. या सपर्धेत शेतकऱ्यांचे सामाजिक कर्तव्‍ये, शेतीचे आर्थिक नियोजन, जमिन, पर्यावरण, ताण-तणाव दूर करण्‍यासाठी उपयोजना, पिक विमा, पाल्‍यांचे विवाह, सेंद्रीय शेती अशा विविध शेती आणि शेतकरी कुटुंबाशी निगडीत २० गुणांची ही प्रश्‍नपत्रिका राहणार आहे.  
स्‍पर्धेचे मुल्‍यमापनासाठी उत्तरपत्रिका तालुकास्तरावर गोळा केल्या जाणार आहे. तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांची तपासणी केल्‍या जाणार आहे. यात सर्वाधिक गुण असलेल्या प्रथम तीन किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी समान गुण घेणारे असल्यास त्या स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठवली जाणार आहे.  जिल्हास्तरावरील बळीराजा चेतना अभियान समिती यापैकी लकी ड्रॉ पद्धतीने अंतिम तीन जणांची निवड करण्‍यात येणार आहे. यास्‍पर्धेत  जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप  सिंह यांनी केले आहे.  

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी