संपर्क अधिका-यांनी जाणून घेतल्‍या शेतक-यांच्‍या समस्‍या
*आठ मंडळामधील 35 गावांचा समावेश
यवतमाळ, दि. 12ः शेतक-यांच्‍या समस्‍या गावातच सोडविण्‍यासाठी ग्रामस्‍तरीय समितीची ज्‍या प्रमाणे स्‍थापना करण्‍यात आली. त्‍याचप्रमाणे प्रत्‍येक मंडळासाठी संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात आली. या संपर्क अधिका-यांनी आपल्‍या मंडळातील जवळपास ३५ गावांना भेटी देवून शेतक-यांच्‍या आणि गावातील समस्‍या जाणून घेतल्‍या.
            वणी तालुक्‍यातील वणी मंडळातील गणेशपूर, लालगुडा, वागद या गावी संपर्क अधिकारी असलेले तहसीलदार रवींद्र जोगे यांनी आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटुंबाना भेटी देवून त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. यामध्‍ये वागदरा येथील वसंतराव लटारी पावडे, गणेपूर येथील मधूकर विठू आसूटकर यांच्‍या कुटुंबांना भेटी देवून समस्‍या जाणून घेतल्‍या.त्‍याचप्रमाणेगावातील पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा, गावालील शाळांची स्थिती, शेतकरी विद्यार्थ्‍यांची समस्‍या, अंगणवाडी, स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून शेतक-यांना मिळणारे धान्‍य, रेशनकार्ड धारकांची संख्‍या यांची माहिती जावून घेतली. यावेळी गावामध्‍ये मंडळ अधिकारी जे. एन झाडे, तलाठी, कृषी सहायक,गामसेवक यावेळी सरपंच, पोलिस पाटील उपस्थित होते. शिंदोला मंडळाचे संपर्क अधिकारी सर्व शिक्षा अभियानाचे शिक्षणाधिकारी श्री. इंगोले यांनी शिंदोला, चिखली, कुरई, शिवर्णी या गावांना भेटी देवून शेतक-यांची संवाद साधला.रासा मंडळाचे संपर्क अधिकारी वणी येथील उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रायांनी मंडळातील रासा, साखरादरा, घोन्‍सा या गावातील शेतक-यांच्‍या घरी भेटी दिल्‍या.
भालर मंडळाचे संपर्क अधिकारी वनसंरक्षक श्री. गौपाल यांनी भालर व भेसा या गावांना भेटी देवून आत्‍महत्‍याग्रस्‍त  विठ्ठल इनामेव सरस्‍वती गणपत इनामे यांच्‍या कुटूंबीयाच्‍या घरी भेटी दिल्‍या यावेळी सरंपच वरदकर, पोलिस पाटील गजानन बदकल, ग्रामस्‍त किशोर निंबेकर, अर्चना हेपट, बेसा येथील सरपंच वसंत वाघमारे यांच्‍यासह ग्रामस्‍थ उपस्थित होते. त्‍याचप्रमाणे राजूरा मंडळातील संपर्क अधिकारी वणीचे गटविकास अधिकारी श्री. खैरे, कायर मडळातील गावांना संपर्क अधिकारी श्री. भट, शिरपूर मंडळातील गावांना संपर्क अधिकारी श्री. मुद्दमवार तर पुनवट मंडळाचे संपर्क अधिकारी डॉ. भालके यानीं मंडळाती गावांना भेटी देवून शेतक-यांच्‍या समस्‍या जाणून त्‍या सोडविण्‍यासाठी संबंधीत अधिका-यांना सुचना केल्‍या.

०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी