आता 8 ऑक्टोबर रोजी लोकअदालत
यवतमाळ, दि.7 :राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 सप्टेंबर रोजी लोकअदालत आयोजित करण्यात आली होती, आता ही लोकअदालत 8 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.
10 सप्टेंबर रोजी होणारी राष्ट्रीय लोकअदालत पुढील महिन्यात 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लोकअदालतीच्या विषयासोबत विलीन करण्यात आली आहे.8 ऑक्टोबर रोजीच्या लोकअदालतीमध्ये वाहतूक, पेट्टी मॅटर, म्युन्सिपल मॅटरसाठी आयोजित करण्यात आली होती.यात 10 सप्टेंबर रोजीच्या लोकअदालतीमध्ये क्रिमीनल कंपाऊंडेबल मॅटर सादर करण्यात येतील.
सामाईक न्युनतम कार्यक्रमानुसार सर्व प्रकारच्या प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांसाठी सामान्य लोकअदालत 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.परंतु गणपती, महालक्ष्मी आणि ईदच्या सणांमुळे ही लोकअदालत 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.या लोकअदालतीमध्ये सर्व तडजोडप्राप्त दिवाणी, फौजदारी प्रकरणे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 10 सप्टेंबरची नोटीस मिळालेल्यांनी 18 सप्टेंबर रोजी उपस्थित राहावे, सर्व संबंधित पक्षकारांनी आपली प्रकरणे 18 सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयांशी संपर्क साधून आपली प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन यवतमाळ जिल्हा विधि सेवा  प्राधिकरणाने केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी