लोकमान्‍य सार्वजनिक गणेशोत्‍सव, लोकमान्‍य उत्‍सव
*शासनाचा सांस्‍कृतिक उपक्रम
*मंडळानी सहभागी होण्‍याचे आवाहन
यवतमाळ, दि. 2 : लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांचे १६० चे जयंती वर्ष तसेच त्‍यांनी सुरू केलेल्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सवाच्‍या चळवळीला १२५ वर्ष  पुर्ण होत आहेत. तसेच ‘स्‍वराज्‍य हा जन्‍मसिध्‍द हक्‍क आहे, आणि तो मी मिळवणारच’ या त्‍यांच्‍या जगप्रसिध्‍द उद्गारांचे शताब्‍दी वर्षनिमित्‍ताने राज्‍यात ‘लोकमान्‍य सार्वजनिक गणेशोत्‍सव आणि लोकमान्‍य उत्‍सव’ सांस्‍कृतिक उपक्रम राबविण्‍यात येत आहे. यामध्‍ये जिल्‍ह्यातील गणेशोत्‍सव मंडळांनी सहभागी होण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
            लोकमान्‍य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्‍सव आयोजित करण्‍याची प्रथा सुरू केली. या गणेश मंडळांच्‍या माध्‍यमातून लोकमान्‍य टिळकांचे विचार, त्‍यांची चतुःश्रुती तसेच अन्‍य उपक्रमांव्‍दारे जनजागृती घडवतील, अशा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळासाठी ही स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी लोकमान्‍य टिळकांना अभिप्रेत असलेले स्‍वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्‍यसनमुक्‍ती, जलसंवर्धन  यापैकी एका कल्‍पनेशी निगडीत देखावा मंडळांना उभारावयाचा आहे. तसेच जिल्‍ह्यात शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविणारे शेती आणि शेतकरीविषयक देखाव्‍यांची निर्मिती करून त्‍यांच्‍या आत्‍मविश्‍वास निर्माण करणे आदी विषय ठेवण्‍यात आले आहे. यासाठी मंडळांनी धर्मादाय आयुक्‍त यांच्‍याकडे नोंदणी केलेली असावी. तसेच यात सहभागी होण्‍यासाठी तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे २९ ऑगस्‍टपर्यंत अर्ज स्विकारण्‍यात येतील.
            या स्‍पर्धेसाठी जिल्‍हास्‍तरावर एक लाख, द्वितीय ७५ हजार, तर तृतीय ५० हजार रूपयांचे बक्षीस देण्‍यात येणार आहे. तालुकास्‍तरावर प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार,  तर तृतीय १० हजार रूपयांचे बक्षीस  देण्‍यात येणार आहे. या स्‍पर्धेमध्‍ये जिल्‍ह्यातील गणेशोत्‍सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी