तलवारबाजी, बुद्धीबळ स्पर्धांच्या तारखांत बदल
यवतमाळ, दि. १ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालयतर्फे आयोजित जिल्हास्तरीय तलवारबाजी  आणि बुद्धीबळ स्पर्धांच्या तारखात बदल करण्यात आला आहे.
तलवारबारी क्रीडा स्पर्धा 2016-17 चे आयोजन दिनांक 6 ते 7 ऑक्टोबर या दिवशी निश्चित करण्यात आले होते. परंतु राज्यस्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन लवकर करण्यात येत असल्यामुळे जिल्हास्तर तलवारबाजरी या क्रीडा स्पर्धा दिनांक 7 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येणार आहे.
तसेच बुद्धीबळ स्पर्धा 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार होत्या. या स्पर्धेच्या सुधारीत कार्यक्रमानुसार 14 व 17 वर्षे मुला, मुलीच्या 6 सप्टेंबर आणि 19 वर्षे मुला, मुलींच्या 7 सप्टेंबर रोजी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यता आल्या आहे. तसेच जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानुसार सर्व स्पर्धक, खेळाडू तसेच विद्यालय व महाविद्यालय यांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल