कृषि विकास, फलोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
*कृषि विभागाचे आवाहन
यवतमाळ, दि. 8 : राष्ट्रीय कृषि विकास योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी नियंत्रित शेती घटकांतर्गत शेडनेट हाऊस, पॉली हाऊस या घटकांची ज्या शेतकऱ्यांना उभारणी करावयाची आहे, त्यांनी संबंधित कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर्व संमती घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी, तालुक्यातील इच्छुकांची यादी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या सादर करण्यात येणार असून त्यातून लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना शेडनेट, पॉलीहाऊस उभारणीनंतर 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत पुष्पोत्पादन, शेडनेट, संत्रा लागवड, पुनरूज्जीवन, 20 अश्वशक्तीपर्यंत ट्रॅक्टर, शेडनेट हाऊस प्रशिक्षण, प्लास्टिक मल्चिंग, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदा चाळ, मसाला पिक, सामुहिक शेतकळे आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी  संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी 10 ऑक्टोबर पूर्वी संपर्क साधून वरील दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा, या योजनेत अनूसचित जाती, जमाती, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी