शेतकऱ्यांना मिळाला शाश्वत सिंचनाचा आधार
*नऊ हजार विहिरी पुर्ण
*धडकमधून साडेआठ हजार विहिरी
*सिंचनामुळे रब्बी पिके वाढणार
यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या कारणांपैकी एक शाश्वत सिंचनाची व्यवस्था नसणे हे एक आहे. यावर उपाययोजना म्हणून पंतप्रधान पॅकेज अंतर्गत धडक सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.
आतापर्यंत पुर्ण करण्यात आलेल्या 9 हजार 247 विहिरींपैकी  8 हजार 593 विहिरी धडक सिंचन, तर 654 विहिरी नरेगामधून पूर्ण करण्यात आल्या आहे. धडक सिंचन विहिरी आणि नरेगात वर्ग झालेल्या विहिरींची संख्या मोठी आहे. विहिरीमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला 20 हजार 800 विहिरींचे लक्षांक देण्यात आले आहे. या योजनेतून 14 हजार 845 विहिरी मंजूर करण्यात आल्या आहे. यातील 7 हजार 164 विहिरी पुर्ण झाल्या असून या शेतकऱ्यांकडे आता शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे आता शेतपिकांचे नुकसान होणार नसून उपलब्ध असलेल्या विहिरीतील पाणीसाठ्यातून पिके वाचविता येणार आहे. एक हजार 848 शेतकऱ्यांनी विहिरी मंजूर होऊन अद्यापही विहिरीचे काम सुरू केले नाही. यामध्ये अद्याप पाच हजार 833 विहिरी वाटप करावयाच्या आहेत.
शिल्लक असलेल्या 5 हजार 833 विहिरींपैकी 1 हजार 819 धडक सिंचन, तर नरेगामध्ये वर्ग केलेल्या चार हजार 14 विहिरी आहेत. सन 2015-16 मध्ये पुर्ण झालेल्या विहिरीमध्ये धडक सिंचनमधून 1 हजार 253, तर नरेगामध्ये वर्ग केलेया 393 विहिरी आहेत. यावर्षी एक एप्रिलपासून धडक सिंचनमधून 176 तर नरेगामधून 261 अशा 437 विहिरी पूर्ण झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये दोन हजार 83 विहिरी पूर्ण झाल्या असून यात धडक सिंचन विहिरीमधून 1 हजार 429 विहिरी पूर्ण करून शेतकऱ्यांना आधार देण्यात आला आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडवाहू शेती असल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एका पिकावर समाधान मानावे लागत होते. धडक सिंचन विहिरीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरडवाहू शेती शाश्वत होण्याबरोबरच पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी आणि उन्हाळी पिकेही शेतकरी घेऊ शकतील. अन्न धान्याच्या उत्पादन वाढीसोबतच पर्यायाने शेतकऱ्यांच्या आर्थिक मिळकतीमध्ये भर पडणार आहे. त्यामुळे धडक सिंचन विहिरीच्या योजनेमधून विहिरी घेऊन त्या पूर्णत्वास नेण्यास जिल्ह्यातील शेतकरी प्रयत्नशील आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी