जिल्हा ग्राहक परिषदेच्या सदस्यत्वासाठी अर्ज करावेत
यवतमाळ, दि. 23 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातील रिक्त असलेल्या उर्वरीत 9 सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. यासाठी पात्र व्यक्तिंनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे असे आवहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातून 9 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. यात जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यांपैकी प्रत्येकी एक, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, पेट्रोल गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधींनीचे दोन, शेतकऱ्याचे प्रतिनीधी एक, असे ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य नियुक्त करण्यात येणार आहे. या प्रवर्गातील संबंधित सदस्य, प्रतिनिधींना अर्जाचा विहित नमुना आणि पात्रतेबाबतचे निकष जिल्हा पुरवठा कार्यालयात उपलब्ध होतील. इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी