‘जलयुक्त’ला मिळाली पाच विभागांची साथ
*वनविभागाने केली पाच हजार कामे
*दगडी बांध बांधण्यावर अधिक भर
*खोलिकरणाची पाचशेहून अधिक कामे
यवतमाळ, दि. 3 : राज्याला टंचाईमुक्त करण्यासोबतच शाश्वत सिंचनाची क्षमता असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला जिल्ह्यात पाच विभागांची साथ मिळाली आहे. वन, भुजल सर्व्हेक्षण, जिल्हा परिषद लघुसिंचन, जलसंधारण आणि कृषि विभागाने तब्बल साडेसहा हजार कामे हाती घेतली आहेत. यात सर्वाधिक पाच हजार कामे वन विभागाने केली आहेत. या पाच विभागांनी 6 हजार 666 उपचाराची कामे सुरू केली आहे. यातील 4 हजार 834 कामे पूर्ण करण्यात आली असून 1 हजार 832 कामे पुर्णत्वास येत आहे.
वनविभागाने हाती घेतलेल्या 5006 कामांपैकी 3 हजार 405 पुर्ण झाली आहे. 225 गॅबियन बंधाऱ्यापैकी 141, 4 हजार 591 अनघड दगडी बांधापैकी 3 हजार 91, 59 सलग समतल चरापैकी 42 यासह 98 वनतळे आणि नाला खोलीकरणाची 33 कामे पूर्ण करण्यात आली आहे. या अभियानात पावसाचे पाणी साठविण्यासोबतच पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी भुजल सर्व्हेक्षण विभागाने मोठी मोहिम आखली आहे. 510 रिचार्ज शॉफ्टच्या कामापैकी 409 कामे पूर्ण करण्यात आली आहे. जलसंधारण विभागाने 228 साखळी सिमेंट नाला बांधापैकी 163 बांधून पूर्ण झाली आहे.
कृषि विभागाच्या 893 कामांपैकी 853 कामे पूर्ण केली आहे. यात 537 सिमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामापैकी 525, तर ढाळीच्या 204 कामांपैकी 176 कामे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 24 सिमेंट नाला बांध, 31 सिमेंट नाला बांध तुटफुट दुरूस्ती, 6 माती नाला बांध, 32 विहिर पुनर्भरण, 59 गाळ काढण्याची कामे पुर्ण करण्यात आली आहे. या अभियानाला जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे चांगले योगदान मिळाले. या अभियानात 22 कोल्हापुरी बंधारे दुरूस्तीपैकी 4 पूर्ण करण्यात आल्या असून 18 कोल्हापुरी बंधारे दुरूस्ती करण्यात येत आहे. तलावाच्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करण्यात येत असून यात तीन सिंचन तलाव तर चार पाझर तलावांची दुरूस्ती करण्यात येत आहे. तलावाच्या दुरूस्तीमुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासोबतच सिंचनाच्या क्षेत्रातही वाढ होण्यास मदत होणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी