प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांची माहिती द्यावी
*जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन
यवतमाळ, दि. 8 : राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती कळविण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.
प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची वार्षिक लेखे अंतिम करण्यासाठी 31 मार्च 2015 पूर्वीच्या जमा रकमांचा ताळमेळ पुर्ण होणे आवश्यक आहे. या प्रलंबित रकमा, अंशदाने केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडे तात्काळ वर्ग करता येऊ शकते यासाठी ज्या कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व आहंरण व संवितरण अधिकारी यांनी जिल्हा कोषागार कार्यालयाशी संपर्क साधून कार्यवाही करावी लागणार आहे. या माहिती अभावी प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित रकमा, अंशदाने केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडे तात्काळ वर्ग होणार नाही. यासाठी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी