नेहरू युवा केंद्रातर्फे स्वच्छता पखवाडा
यवतमाळ, दि.7 :नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्ह्यात 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान स्वच्छता पखवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केंद्राशी संलग्नित युवा मंडळाच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबविण्यात आले.कार्यक्रमामध्ये स्वच्छतेची शपथ, गोष्टी, सेमिनार, चर्चासत्र आदींच्या माध्यमातून घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व समाजवून सांगण्यात आले.तसेच स्वच्छता या विषयावर तज्ज्ञ व्यक्तिंकडून मार्गदर्शन करण्यात आले.नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी प्रभात फेरी, रॅली, स्वच्छता दौड, सामान्यज्ञान स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले.या उपक्रमांमध्ये नागरीकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.

000000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल