राज्यमंत्री मदन येरावार यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन
यवतमाळ, दि. 7 : ऊर्जा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम तथा अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्याहस्ते यवतमाळ शहरातील विविध विकास कामांचे आज भुमिपूजन झाले. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कॉक्रीट रस्ते, नाली बांधकाम तसेच रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
शहरात ठिकठिकाणी झालेल्या भुमिपूजन प्रसंगी राज्यमंत्री श्री.येरावार यांच्यासह नगरसेवक मोहन देशमुख, प्रविण प्रजापती, रेखा कोठेकर, माजी नगरसेवक सुनिल समदुरकर, अजय राऊत, अजय बिहाडे तसेच राजु पडगीलवार, दी.सु.पाटील आदी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री.येरावार यांच्या आमदार निधीतून सदर विकास कामे होणार आहे.
आज भुमिपूजन झालेल्या कामांमध्ये प्रभाग क्रमांक 1 पिंपळगावमध्ये 3 लाख 71 हजार रूपये खर्चाच्या काँक्रीट नालीचे बांधकाम, याच प्रभागातील नारींगे नगर येथील 6 लाख 14 हजार रूपये खर्चाचे नालीचे बांधकाम, प्रभाग क्रमांक 2 भारत नगर येथे 5 लाख रूपये  खर्चाचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम, प्रभाग क्रमांक 7 शारदा चौक येथे 3 लाख 76 हजार खर्चाचे सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम याच प्रभागातील तारपुरा येथे 4 लाख 89 हजार रूपये खर्चाचे सिमेंट रस्ता बांधकाम याच प्रभागातील अरुणोदय सोसायटीमध्ये 7 लाख 28 हजार खर्चाचे नालीचे बांधकाम, प्रभाग क्रमांक 9 समर्थवाडी येथे 4 लाख 45 हजार खर्चाचा रस्ता, समर्थवाडीतीलच 3 लाख 80 हजार खर्चाचे रस्ता बांधकाम आदी कामांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 9 मधील गिलाणी नगर येथे 3 लाख 6 हजार रूपये खर्चाचा रस्ता, शिवाजी नगर येथे 3 लाख 9 हजार खर्चाचे रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणाचे काम, शास्त्रीनगर येथील 4 लाख 22 हजार खर्चाचे रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे श्री.येरावार यांच्याहस्ते भुमिपूजन झाले.
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी