वीर मातेलाही महसूल विभागाची मदत
*बळीराजाचा चेतना अभियानाचा पुढाकार
यवतमाळदि.28ः  श्रीनगरमधील उरी येथे 18 सष्‍टेंबर रोजी झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात वीर मरण आलेल्‍या विकास कुडमेथे यांच्‍या वीर पत्‍नी यांना 51 हजार 400 रूपयांची मदत देण्‍यात आली होती. त्‍याचप्रमाणे वीरमाता विमल जर्नादन कुडमेथे यांना 55 हजार 800 रूपयांची मदत वितरीत करण्‍यात येणार आहे. हि मदत कुटुंबीयांसाठी वैयक्‍तीक स्‍तरावर महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी 1 लाख 7 हजार 200 रूपयांची मदत गोळा करण्‍यात आली होती. हि मदत बळीराजा चेतना अभियान समितीच्‍या पुढाकारोने  वितरीत करण्‍यात आली.
यासाठी अपर जिल्‍हाधिकारी लक्ष्‍मण राऊत यांनी 5 हजार रूपयांची मदत केली असून महसूल विभागातील उपजिल्‍हाधिकारी संवर्गातील आणि उपविभागीय अधिका-यांनी प्रत्‍येकी दोन हजार रूपये मदतनिधी दिला. तर तहसीलदार नायबतहसीदार संघटनेकडून 15 हजार रूपये, पुसद तहसील कार्यालयाने  15 हजारजिल्‍हा पुरवठा अधिकारी कार्यालय व तहसील पुरवठा निरीक्षक कार्यालयाकडून 15 हजार रूपये,तहसीलदार सचिन शेजाळ यांनी वैयक्‍तीक 10 हजार रूपयेनेर येथील पोलिस पाटील संघटनेच्‍या वतीने 5 हजार आणि इतर जिल्‍हयातील महसूल विभागातील कर्मचा-यांकडून वैयक्‍तीक स्‍तरावर असे एकून 1 लाख 7 हजार 200 रूपये  शहिद विकास कुडमेथे यांची आई विमल कुडमेथे व पत्‍नी स्‍नेहा कुडमेथे यांना ही मदत  निधी बळीराजा चेतना अभियान समितीच्‍या पुढाकाराने विभागून देण्‍यात आली.  त्‍यांचबरोबर समाजातील विविध घटकांनी पुढे येऊन शहिद विकास कुडमेथे यांच्‍या कुटुंबीयाना मदत करावी असे आवाहन महसूल अधिकारी कर्मचारी यांच्‍या कडून करण्‍यात आले.
36117238798 खात्‍यात
थेट मदत करण्‍याचे आवाहन 
जिल्‍हयातील दानशूर व्‍यक्‍ती  धार्मिक संस्‍थाशैक्षणिक संस्‍थाविविध सामाजिक संघटनासंस्‍थायांनी पुढे येऊन शहिद जवान विकास कुडमेथे यांच्‍या कुटुंबीयांना मदत करावी. यासाठी वणी तालुक्‍यातील स्‍टेट बॅंक ऑफ इंडियाच्‍या कायर शाखेमध्‍ये आई विमल कुडमेथे व पत्‍नी स्‍नेहा कुडमुथे यांच्‍या नावाने  36117238798 या खात्‍यात हि मदत जमा करावी असे, आवाहन महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केले  आहे.       
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी