लघु उद्योग स्थापन करण्यासाठी नोंदणी 
यवतमाळ, दि. 23 : जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत कृषि विकास प्रकल्पांतर्गत कृषिपुरक लघु उघोगासाठी आवश्यक असणारे प्रकल्प अहवाल (Project Report) महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी आणि शेतकरी गटांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प अहवाल नि:शुल्क तयार करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक शेतकरी व शेतकरी गटांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आपली नोंदणी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, गार्डन रोड, येथे करावी, तसेच जगदिशकुमार कांबळे, कृषि पणन तज्‍ज्ञ, एमएसीपी यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी