सामुहिक प्रोत्साहन योजनेसाठी संकेतस्थळ सुरु
यवतमाळ, दि. 3 : उद्योग विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी Entrepreneur Registration and Incentives Management System (ERIMS) प्रणाली 9 ऑगस्ट 2016 पासून di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे.
सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी 20 ऑगस्ट 2016 पासून फक्त ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. जिल्ह्यातील पात्र उद्योजकांनी या संकेतस्थळावर अर्ज करून सामुहिक प्रोत्साहन योजनेमधील सवलतीचा लाभ घ्यावा, ऑनलाईन अर्ज  नोंदविण्यास अडचण येत असल्यास जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. एस. मुद्दमवार यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी