अवयवदानाची चळवळ यापुढेही कायम राहिल
-मदन येरावार
यवतमाळ, दि. 2 : जिल्ह्यात महाअवयवदान अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आले आहे. जिवंतपणी अवयवदान केलेल्यांचा गौरव अवयवदात्यांच्या भावना समाजापर्यंत पोहचविण्यासाठी महत्वपूर्ण आहे. या कार्यक्रमांतर्फे होत असलेले कार्य यापुढेही सुरू राहिल, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित महाअवयवदान उपक्रमांत अवयवदान केलेल्या नागरीकांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील व्याख्यान कक्षात झालेल्या या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हाशल्याचिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. भगत हे उपस्थित होते.
श्री. येरावार यांनी हे अभियान राबविणाऱ्यांचे खरोखरच कौतुक करावे लागेल. येत्या काळात हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असेल ती मदत पुरविण्यात येईल. एक व्यक्ती सात अवयवदान करू शकतो आणि ते लोकांना उपयोगी पडू शकत असल्यास प्रत्येक नागरिकाने आपले फॉर्म भरून द्यावेत असे आवाहन केले. या अवयवदानात आपणही फॉर्म देखील भरलेला असल्याचे सांगून श्री. येरावार म्हणाले, अवयवदानाव्यतिरिक्त वृक्षारोपण कार्यक्रम वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात आला आहे. येत्या काळात आयोजित करावयाचे भव्य असे ऑपरेटेड शिबिराच्या संकल्पनेविषयी सांगितले.
भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासंबंधात आणि भारताचा विकासाचा दर हा पैशाच्या रुपात न मोजता तो सकारात्मक विचाराच्या हिशोबात मोजण्यासारखा कसा होईल, याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे झाल्यास भारताचा विकास निश्चितच होईल. वैद्यकीय महाविद्यालयाकरीता चार डायलेसिस उपकरणे प्राप्त करण्याची कार्यवाही झालेली आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन होवून कामास सुरूवात होणार आहे. तसेच स्थानिक नागरीकांना एमआरआयसाठी इतर ठिकाणी जावे लागू नये यासाठी एमआरआयची सुविधा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अवयवदानाबाबत जनजागृतीकरण्यासाठी महाअवयवदान अभियान दि. 30 ऑगस्ट  ते  1 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात आले. या अभियानाचा शेवट जिवंतपणी अवयवदान केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिवंतपणी अवयवदान करणारे अवयवदाते सुरेखा सुधीर पवार, रा. यवतमाळ, उमाकांत पांडुरंग काळे, रा. दिग्रस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अवयवदात्यांनी जिवंतपणी अवयवदान केल्यामुळे शरीरावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगितले. तसेच नागरीकांनी अवयवदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले.
बुधवारी, दि. 31 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यशाळा, चर्चासत्र, चित्रकला, निबंधस्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्री. येरावार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालय व विविध कार्यालयाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी संस्था, समाजसेवक पत्रकार, डॉक्टर, कर्मचारी संघटना, सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्यावतीने जिल्हा माहिती अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
डॉ. धोटे यांनी मनोगत व्यक्त केले, डॉ. अशोक राठोड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिल्पा गुप्ता यांनी आभार मानले.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी