साहित्याचे मातीशी नाते जोडणारा कवी गमावला : मुख्यमंत्री
मुंबई, दि.1 : ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर ऊर्फ काका बडे यांच्या निधनाने साहित्याचे मातीशी नाते जोडणारा आणि वऱ्हाडी भाषेचा आग्रहाने पुरस्कार करणारा कवी मराठी साहित्य विश्वाने गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बडे यांनी आपल्या कवितांतून शेतकऱ्यांचे भावविश्व मांडले. मातीशी नाळजोडणाऱ्या त्यांच्या कविता थेट काळजाला भिडणाऱ्या असल्याने लोकांच्या ओठी रूळल्या. त्यांच्या लघुकथाही जगण्याचे मर्मसांगणाऱ्या आहेत. लेखनासोबतच एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी वऱ्हाडी लोकजीवनाचे प्रभावीपणे सादरीकरण केले.त्यांच्या निधनाने  वऱ्हाडी भाषेला साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणारा एक भाषाप्रेमी गमावला आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी