16 सप्टेंबरपासून मतदारयाद्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम
यवतमाळ, दि. 14 : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका 2017 मध्ये होणार आहेत. या निवडणुकांसाठी दि. 1 जानेवारी 2017या पात्रता दिनांकावर आधारीत विधानसभेची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा मतदारयाद्यांचे पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
दि. 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या पात्र नागरीकाने या कालावधीत मतदारयादीत नाव नोंदविले तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचेममध्ये मतदान करता येणार आहे. नवीन नाव नोंदविण्याबरोबरच नावामध्ये दुरूस्ती, दुबार किंवा मयत व्यक्तीचे नाव वगळणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी मतदारयादीमध्ये आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी