कबड्डी स्पर्धांच्या तारखेत बदल
*22 ते 24 सप्टेंबर दरम्यान आयोजन
यवतमाळ, दि. 14 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा 2016-17 चे आयोजन दि. 26 ते सप्टेंबर यादरम्यान निश्चित करण्यात आले होते. परंतु विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा दि. 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होत आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 22 सप्टेंबर रोजी 14 वर्षे मुले, मुली, 23 सप्टेंबर रोजी 17 वर्षे मुले, मुली आणि 24 सप्टेंबर रोजी 19 वर्षे मुले, मुलींच्या स्पर्धा यवतमाळ येथील जयहिंद क्रीडा मंडळ येथे घेण्यात येणार आहे. याची सर्व स्पर्धक, खेळाडू तसेच विद्यालय आणि महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल